जर तुम्ही काही कारणास्तव आपल्या बँकेत जाऊन आपला बॅलेन्स बघू शकत नाही, तसेच तुमचा पासबुक पण अपडेट होत नाही, आणि तुम्हाला समजत नाही कि तुमचा बँकेत तुमचा बॅलेन्स किती आहे, असे असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घर बसल्या तुम्ही कशाप्रकारे आपला बँक बॅलेन्स चेक करू शकता.

 

                     

 

 

 SBI बँक मध्ये आपला बँक बॅलन्स कसा चेक करावा ?

बॅलन्स संदर्भात माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांना 9223766666 किंवा या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क करावा लागेल. काही सेकंदातच तुम्हाला SMS द्वारे माहिती पुरवण्यात येईल. त्याचप्रमाणे रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून ‘BAL’ असा मेसेज 09223766666 या क्रमांकावर पाठवल्यास बॅलेन्स संदर्भात माहिती मिळेल.

 

मिनी स्टेटमेंट कसं मिळवाल?

09223866666 या टोल फ्री क्रमांकावर ‘MSTMT’ असा मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून पाठवल्यास तुम्हाला मिनी स्टेटमेंट मिळू शकेल. शेवटच्या 5 ट्रान्झॅक्शनची माहिती तुम्हाला या मिनी स्टेटमेंटमधून मिळू शकते. 09223866666 मिस्ड कॉल देऊनही तुम्ही मिनी स्टेटमेंट मिळवू शकता.

 

चेकबुकसाठी करू शकता अर्ज

एसबीआय बँकिंग आणि मोबाइल सर्व्हिसच्या माध्यमातून SBI चेकबुकसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला ‘CHQREQ’ असा मेसेज 09223588888 या क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला एक SMS येईल ज्यात एक नंबर पाठवला जाईल. दोन तासांच्या आतमध्ये CHQACCY6 या मेसेजबरोबर बँकेकडून मिळालेला नंबर 09223588888 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

 

6 महिन्याचं बँक स्टेटमेंटही सहज मिळू शकतं

SBI ग्राहक 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट देखील सहज मिळवू शकतात. अर्ज केल्यानंतर रजिस्टर्ड मेलवर तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट PDF फाइलच्या स्वरूपात मेल करण्यात येईल. यासाठी ‘ESTMT <space> <Account Number> <space> <code> टाइप करुन तुम्हाला 09223588888वर SMS करावा लागेल. तुमच्या निवडीनुसार 4 डिजीट असणाऱ्या कोडच्या मदतीने ही PDF फाइल इनक्रिप्ट करता येईल.

 

या सेवांसाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया

एसबीआय बँकिंग आणि मोबाइल सर्व्हिसच्या अंतर्गतक सेवा मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. हे काम देखील तुम्ही मोबाइलच्या मदतीने करू शकता. याकरता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून ‘REG Account Number’ हा SMS 09223488888 वर पाठवावा लागेल.

 

                   

 

 

 

                     

 

 

 

                             

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                                     

 

 

 

                                      

                                            

                                                

 

 

                                     

 

                             

 

 

 

 

 

 

 

 

complete-information-sbi-pos-recruitment
download (1).png
925004501s.png
download (2).png
download (3).png
download (4).png
download (5).png

  PNB बँकेचा बँक बॅलेन्स कसा चेक करावा?

ज्या यूजर्सनी आपला मोबाईल नंबर बँक कडे रजिस्टर केला आहे, त्यांच्यासाठी एक सुविधा उपलब्ध आहे, ज्यात तुम्ही त्यांच्या टोल फ्री नंबर वर कॉल करून तुमचा बँक बॅलेन्स चेक करू शकता. तुम्हाला यासाठी 18001802223 वर कॉल करावा लागेल, याव्यतिरिक्त तुम्ही 0120-2303090 वर कॉल करून पण तुमचा अकाउंट बॅलेन्स चेक करू शकता, तुम्ही SMS ने पण असे करू शकता. 

 HDFC बँकेतील बँक बॅलेन्स कसा चेक करावा?

HDFC बँकेने वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळा टोल फ्री नंबर दिला आहे. तुम्ही त्यांच्यावर कॉल करून तुमच्या अकाउंट बॅलेन्स पासून अकाउंट स्टेटमेंट इत्यादींची माहिती घेऊ शकता. पण आज आम्ही तुम्हाला मात्र बॅलेन्स चेक करण्याबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला सांगू इच्छितो कि जर तुमचे अकाउंट HDFC बँकेत असेल तर तुम्ही 18002703333 वर कॉल करून तुमच्या अकाउंट बॅलेन्सची माहिती घेऊ शकता. जर तुम्ही SMS च्या माध्यमातून तुमचा अकाउंट बॅलेन्स बघू इच्छित असाल तर तुम्हाला 567612 वर SMS करावा लागेल. 

           बँक ऑफ इंडियाची शिल्लक चौकशी क्रमांक किती आहे? 

खाते शिल्लक चौकशी क्रमांक आहे - 02233598548. महत्त्वाचे अद्यतन- बँक ऑफ इंडियाचा मिस कॉल शिल्लक चौकशी क्रमांक                      बदलला आहे. नवीन क्रमांक- 09015135135 आहे.

       अधिक माहितीसाठी  येथे क्लिक करा 

    विश्व स्तरीय ग्राहक सेवा अनुभव के लिए  हमसे संपर्क करें.  यहाँ क्लिक करें

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अधिक माहितीसाठी  इथे क्लिक करा 

          चंद्रपूर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अधिक माहितीसाठी   इथे क्लिक करा 

 बँक ऑफ महाराष्ट्र च्या अधिक माहितीसाठी  इथे क्लिक करा 

GOOGLE PAY वरून कसा चेक करावा आपला अकाउंट बॅलेन्स?

जर तुम्ही तुमच्या फोन मध्ये गूगल पे वापरात असाल तर तुमचे अकाउंट यासोबत लिंक असल्यामुळे तुम्ही अगदी सहज या ऍप वर जाऊन तुमचा पिन आणि पास कोड वापरून तुमचा अकाउंट बॅलेन्स कोणत्याही कॉल आणि SMS विना बघू शकता. 

अशाप्रकारे तुम्ही याव्यतिरिक्त इतर अनेक बँकांचे बँक बॅलेन्स सहज चेक करू शकता, तुम्ही IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक, ICICI इत्यादी बँकेतील बॅलेन्स त्या बँकांनी दिलेल्या नंबरवर किंवा ऍप वरजाऊन तुमचा अकाउंट बॅलेन्स बघू शकता.